ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षण


स्तुत्य उपक्रम : ३० महिलांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ
अमळनेर : महिलाही सर्वांगिण दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी नेहमी तत्पर असणारी अमळनेर येथील सेवाभावी संस्था ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात ३० महिलांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
पहिल्या दिवशी हिरालाल पाटील आणि संजय पाटील यांनी महिलांना गृह उद्योग करताना येणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी तर राजश्री पाटील यांनी महिलांसाठीचे प्रेरक स्त्रोत याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र जळगावचे प्रशिक्षक समन्वयक विजय सैंदाणे यांनी उपस्थित महिलांना  मेणबत्ती, फिनाइल, वॉशिंग पावडर आणि द्रव साबण कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले. शिवाय गृहउद्योगासाठी कच्चा माल कुठून आणावा, तयार केलेला माल कसा आणि कुठे विकावा तसेच उद्योग उभारणीसाठी कर्ज कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन केले.
प्रास्तविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान भवरे, सचिन अहिरे, अनिता मोरे यांनी प्रयत्न केले.


Comments