ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे महिला बचत गटांना निःशुल्क व्यावसायिक मार्गदर्शन


बचत गटातील महिलांना हाताला काम मिळून रोजगार प्राप्त व्हावा आणि त्या सक्षम व्हाव्यात, यादृष्टीने ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे ‘महिला बचत गट व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम २०२०-२१’ राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंघाने महिला बचत गटाने कशा पद्धतीने व्यवसायास सुरुवात करावी, सुरु केलेल्या व्यवसायाची वृद्धी कशी करावी, घरगुती तयार केलेल्या मालाला मार्केट कसे उपलब्ध करावे याबाबत यशस्वी बचत गटांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवून  सविस्तर माहिती प्रोजेक्टरद्वारे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.
११ मार्च रोजी अमळनेर तालुक्यातील मुडी, करणखेडा आणि पातोंडा गावातील सुमारे १०० ते १२५ बचत गटातील महिलांना ही माहिती देण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी सोनल पाटील आणि स्रेहा वाघ यांचे सहकार्य लाभले.

Comments