नैराश्येने त्रस्त आहात? आत्महत्येचे विचार येतायत? थांबा, फक्त आमच्याशी दोन शब्द बोला...

ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

सध्या दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. किशोरवयीन मुलं, तरुण तसेच वृद्ध लोकं कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवत आहेत. विविध समस्यांमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात नैराश्यता येते, मात्र या नैराश्यवर वेळीच उपाय होत नाही, आणि नैराश्यता वाढत जाते. शेवटी या नैराश्यच्या गर्गेतच संबंधीत व्यक्ती आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळतो. दरवर्षी लाखो लोकं आत्महत्या करतात. आत्महत्या करणारा तर चालला जातो, मात्र त्याच्या पश्चात कुटुंबावर मोठे संकट कोसळते. 

अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून ज्ञानवर्धिनी फाउंडेशनने एक नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून जे कोणी नैराश्येत असतील त्यांना त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून अपेक्षित आणि ठोस प्रयत्न केले जातील. खालील समुपदेशक अर्थात मानस स्रेही हे आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असून सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा त्यांना मोठा अनुभवदेखील आहे. सामाजिक निकड लक्षात घेता या तज्ज्ञांच्या सहकार्याने ज्ञानवर्धिनी फाउंडेशन सदर उपक्रम राबवित आहे. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा संबंधीत नैराश्यग्रस्ताला नैराश्यतून बाहेर काढण्यासाठी होणार असून एकप्रकारे तो व्यक्ती नवीन जीवन जगण्यास प्रवृत्त होणार आहे.

जर एखादा व्यक्ती, आपल्या परिवारातील सदस्य किंवा आपल्या भोवताली कोणी विविध समस्यांमुळे निराश झाला असेल किंवा डिप्रेशनमध्ये गेला असेल आणि त्याच्या मनात आत्महत्यासारखे नको ते विचार येत असतील तर कृपया फक्त एकदा खालील तज्ज्ञ, समुपदेशकांना कॉल करुन केवळ दोन शब्द बोला. हे तज्ज्ञ आपल्याला नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच आपली मदत करतील. कारण आत्महत्या हे शेवटचं उत्तर नाहीय.

आपले मानस स्नेही
  • संदिप घोरपडे ८२७५०५४३१० (तज्ज्ञ मार्गदर्शक, यशदा पुणे व शिक्षणतज्ज्ञ), 
  • रवींद्र मोरे ९४२३९५०७३३, (समुपदेशक, संस्थापक अध्यक्ष: ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, दै. लोकमत उपसंपादक, जळगाव), 
  • सारिका डफरे ९४२२०१७७६३ (शिक्षणाधिकारी/प्रादेशिक संचालक, प्रभारी दत्तोपंत ठेंगडी, राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, नाशिक),
  • डिगंबर महाले ९८५०३४४४२२ (अध्यक्ष : मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर), 
  • रणजीत शिंदे ९४२२२८२४८९ (मुख्याध्याक : सरस्वती विद्या मंदीर, अमळनेर आणि सामाजिक कार्यकर्ता), 
  • रागिब अहमद ८४४६३८००४० (कॉन्सिलर, श्री संतुलन न्युरो सायकॅट्रि हॉस्पिटल, जळगाव) 
  • डॉ. दिनेश पाटील ९८५०९९८०५० (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, अमळनेर) 
  • बन्सिलाल भागवत ९९७०९६४५९६ (निवृत्त शिक्षक), 
  • प्रमोदिनी पाटील ९४०४५९४१८६(समुपदेशक  आणि मुख्याध्यापिका, प्रताप हायस्कुल, अमळनेर), 
  • अपर्णा सुपे ८६६८५२२६६९ (आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सर्टिफाईड योगा ट्रेनर), 
  • राजश्री पाटील ९६३७६६८८१९ (उपाध्यक्ष, ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्ते, यशदा पुुणे, प्रशिक्षक), 
  • प्रा. कृणाल महाजन ९२०९२५०५५५ (योगतज्ज्ञ आणि समुपदेशक, जळगाव), 
  • निलेश साळुंखे ९४२३९०२७७९ (समुपदेशक, शिक्षक: सु.हि. पाटील हायस्कुल, मारवड, ता. अमळनेर)  

मित्रांनो, आपल्या स्वत:च्या, किंवा घरातील कोणत्याही सदस्याच्या वागण्यात काही बदल जाणवत असतील किंवा आपल्या परिसरात कोणीही नैराश्येत असलेले आढळून आले तर दुर्लक्ष करु नका, स्वत:हूून पुढाकार घ्या आणि नि:संकोच संपर्क साधा. कदाचित आपल्या पुढाकाराने कोणाला जीवनदान मिळू शकतं...
                                                                                                      - ज्ञानवर्धिनी फाउंडेशन


Comments