जागतिक योग दिनानिमित्त योग यज्ञाचे आयोजन

अमळनेर येथे जागतिक योग दिनानिमित्त महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व ज्ञानवर्धिनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 21 जून रोजी भव्य योग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. 

        महाएनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील 2000 स्वयंसेवी संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. जागतिक योग दिनानिमित्त महाएनजीओ फेडरेशनच्या 100 सदस्य संस्था राज्यभर एकाचवेळेस योग शिबीर घेणार आहेत. सदर योग शिबीर श्री श्री रविशंकरजी याच्या बेंगलोर येथील तज्ञ योगा प्रशिक्षीका रूची सुद यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील महाएनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून ऑनलाईन लिंक द्वारा घेण्यात येणार आहे. हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टवर दाखवून 25 ते 50 व्यक्तीच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तीपर गितांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले जाणार आहे.

        राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व शासन नियमांचे पालन करून हि शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत कोरोना हा आजार मनुष्याच्या फुफ्फूसावर  आघात करतो योगा व प्राणायामांनी फूफ्फसांची कार्यक्षमता वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते या शिबिराचा निश्चितच कोरोनापासून बचाव तथा कोरोना मुक्तीसाठी उपाय म्हणून  उपयोग होऊ शकतो म्हणून या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाह विजय वरूडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले, मुकुंद शिंदे व ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले आहे. कार्यक्रमाची सांगता महाएनजीओ चे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने होणार आहे.

Comments