अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे नुकतेच ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि आयसीआयसीआय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या राष्टÑीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत ४० तरुणांना नि:शुल्क व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत सरकारच्या राष्टÑीय कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यायसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना औद्योगिक व्यवसायाशी संबंधीत नोकरी तसेच रोजगार उपलब्धही केला जातो. इयत्ता ८ वी ते १२ वी पास तसेच १८ ते ३० वयोगटातील तरुणांना औरंगाबाद येथे या प्रशिक्षणांतर्गत नि:शुल्क रेफ्रिजरेशन अॅँड एसी रिपेअर, डोमेस्टिक होम अॅँप्लायन्सेस, सेलिंग स्किल्स तसेच आॅफिस अॅडमिनिस्ट्रेशन हे चार अभ्यासक्रम तीन महिन्याच्या कालावधीत नि:शुल्क शिकवले जातात. शिवाय एकवेळचे जेवण व नास्ताही दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण करणाºया तरुणांना प्रमाणपत्रासह नोकरीची संधीही उपलब्ध केली जाते.
सदर कार्यक्रमात याबाबतचे मार्गदर्शन आयसीआयसीआय अकॅडमीचे सल्लागार विश्वास जोशी आणि शकील जमादार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलीस पाटील सुधाकर पवार, ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे, संजय त्र्यंबक पाटील, लीलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर तालुक्यातील गरजू तरुणांना हे नि:शुल्क प्रशिक्षण करायवाचे असल्यास ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे ९४२३९५०७३३ यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment