भडगाव येथील महिलांनी घेतले स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे धडे


भडगाव : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  भडगाव येथील महिलांनी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे धडे घेतले. अभिनव बहुउद्देशिय संस्था, भडगाव आणि ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव डिएमएलटी कॉलेज, भडगाव परिसरात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनव बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे, प्रशिक्षक अनिता वाघ आणि भारती वाणी उपस्थित होेते.
या कार्यक्रमात उपस्थित महिलांना घरच्या घरी वॉशिंग पावडर, निळ, फिनाईल तसेच द्रव साबण आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण अनिता वाघ यांनी दिले. शिवाय घरीच तयार केलेल्या मालाला मार्केट कसे उपलब्ध होईल याबाबत रवींद्र मोरे आणि भारती वाणी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले.

Comments