जागतिक महिला दिनानिमित्त चौबारीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन..!


महिला सक्षम तर गाव सक्षम...!
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे ६ आणि ७ मार्च रोजी दोन दिवसीय महिला जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवशीय महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात मार्गदर्शक शिक्षणाधिकारी सौ सारिका डफरे, फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे, समन्वयक राजश्री पाटील, शामकांत सोनवणे, गोविंदा साळुंखे आदींनी उपस्थित महिलांना त्यांचे शिक्षण, आरोग्य, पंचायत राज, अंधश्रद्धा, महिला बचत गट आदी विषयांवर मार्गदर्शन करत गाव विकासासाठी महिलांची भूमिका किती महत्त्वाची याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समारोप करताना भारती पाटील यात खूप भावुक झाल्या. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात 40 महिलांनी सहभाग घेतला होता.  महिलांमधील विचारांचे परिवर्तन होत त्या कशा सक्षम होतील या उद्दिष्टासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांचा उदंड प्रतिसाद पाहत शिक्षणाधिकारी सारिका मॅडम यांनीही महिलांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा सेविका मीना दिनेश पाटील यांनी सहकार्य केले.


Comments